पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सेवा फाउंडेशनच्या वतीने शहरातील विविध भागात २०० झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे. मग त्यामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र, बुद्धविहार, साकला कॉलनी, विद्या नगर येथील हनुमान मंदिर या ठिकाणी आजही ही ती झाडे पाच वर्षापासून डोलत आहे. वेळोवेळी त्यांची निगा राखली जात आहे..
.
समाजामध्ये संस्कार रुजविण्यासाठी सेवा फाउंडेशन तर्फे दर मंगळवारी संध्याकाळी ७.४५ वा. विद्यानगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठन केली जाते. हा कार्यक्रम १० मिनिटांचा असतो. लहान मुलांना संस्कार पर गोष्टी व सुविचार सांगितल्या जातात. विविध संतांची वचने सांगितले जातात. दर शनिवारला शारदा कॉलनी मध्ये हनुमान चालीसा वाचली जाते. (तसेच बोदवड शहरातील विविध मंदिरांमध्ये ५ मंदिरामध्ये सामुहिक हनुमान चालीसा पठन केली जाते. व साळशिंगी व नाडगाव येथे हनुमान मंदिरात सुध्दा २०२९ पासून सुरु केलेली आहे.)
.
1) मुलांना दत्तक घेवून त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केलेल्या आहेत. त्यामध्ये (एकलव्यनगर ) भिलवाडीतील गरजू मुलांना तसेच समाजातील प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी जबाबदारी हाती घेतलेली आहे.
2) समाजाचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने स्वच्छता अभियान राबवले जाते. शहरातील विविध भागात स्वच्छता विषयक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. याखेरीज गरजू व्यक्तींना संस्थेतर्फे स्वच्छता गृह बांधणे कामी शासकीय अनुदान व मदत मिळवून दिली जाते. शाळेतील मुलामुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून त्यांना मोफत औषधी वाटली जातात. तसेच विविध
3) शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबीर व गरजूंना मोफत औषध उपचार देण्यात येतात. ६) वेळोवेळी सेवा फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
4) मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते. हुशार व गरजूंना पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात.
तज्ञाव्दारे (संबंधित डॉक्टर) समाजातील (दारू) व्यसनमुक्तीसाठी योग्य ते मार्गदर्शन सल्ला व औषधोपचार देण्यात येते.
संपर्क
सेवा फाऊंडेशन, (ऑफिस)
पत्ता
चौधरी क्लिनिक व डिजीटल एक्सरे सेंटर, सेंट्रल बँकेजवळ, श्रीकृष्ण मेडीकलच्या वर (पहिला मजला)
स्टेशन रोड बोदवड.
फोन नं. 9309736646 ,7020352139
संस्थापक अध्यक्ष
डॉ.विशाल सुभाष चौधरी
सेवा फाऊंडेशन बोदवड) फोन नं. 9370743146
ई-मेल
Website
facebook Sevafoundation
सेवा फाउंडेशन ही बोदवड पंचकोशीतील काही समविचारी मित्रांनी आपल्या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एक संस्था आहे. तसेच सेवा फाउंडेशन ही सेवा भावी संस्था असून शासनमान्य रजिस्ट्रेशन केलेली आहे. आपल्या परिसराची सेवा मानव व निसर्ग या दोन माध्यमातून करणारी ही संस्था आहे