आजच्या संगणकाच्या युगात आपली भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे समाजातील गुन्हेगारी, अनैतिक वर्तन, बलात्कार भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने मुलांवर चांगले संस्कार रुजाविण्यासाठी परिसरात एक बालसंस्कार केंद्र उभारण्याची संस्थेची भविष्यकालीन दृष्टी आहे....
दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत आहे. बेसुमार जंगलतोड होत आहे. तेव्हा वृक्षारोपण करणे ही आमची महत्वपूर्ण गरज आहे. त्यासाठी सेवा फाउंडेशन तर्फे येत्या दोन वर्षात कमीत कमी ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्याचे ठरविलेले आहे.
कोविड काळातील भीषण परिस्थिती आपणास जात आहे. या प्रतिकूल काळात रुग्णवाहिका या जीवनदान देणाऱ्या ठरल्या. हे लक्षात घेवून ना नफा, ना तोटा तत्वावर आधारीत रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी समाजसेवेसाठी भविष्यात सुरु करण्याचा संस्थेचा भविष्याकालीन विचार आहे.
त्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे व परिसरातील मुलांना कौशल्य वाढीसाठी
वर्ग सुरु करणे.
संपर्क
सेवा फाऊंडेशन, (ऑफिस)
पत्ता
चौधरी क्लिनिक व डिजीटल एक्सरे सेंटर, सेंट्रल बँकेजवळ, श्रीकृष्ण मेडीकलच्या वर (पहिला मजला)
स्टेशन रोड बोदवड.
फोन नं. 9309736646 ,7020352139
संस्थापक अध्यक्ष
डॉ.विशाल सुभाष चौधरी
सेवा फाऊंडेशन बोदवड) फोन नं. 9370743146
ई-मेल
Website
facebook Sevafoundation
सेवा फाउंडेशन ही बोदवड पंचकोशीतील काही समविचारी मित्रांनी आपल्या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एक संस्था आहे. तसेच सेवा फाउंडेशन ही सेवा भावी संस्था असून शासनमान्य रजिस्ट्रेशन केलेली आहे. आपल्या परिसराची सेवा मानव व निसर्ग या दोन माध्यमातून करणारी ही संस्था आहे