सेवा फाउंडेशन बोदवड
बोदवड येथे सेवा फाउंडेशन कडून रक्तदान शिबिर संपन्न..दि.०८/०८/२०२३रोजी बोदवड येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे सेवा फाउंडेशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विशाल सुभाष चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव येथील शासकीय महाविद्यालय व रक्तपेढी रुग्णालय कडून रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले.सेवा फाउंडेशन ही संस्कार,शिक्षण,पर्यावरण,व्यसनमुक्ती यासाठी समाजात काम करीत असते.गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करणे, वृक्षारोपण करणे,यासारखे अनेक उपक्रम या फाउंडेशन कडून राबविले जातात.यावेळी डॉ विशाल चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बोदवड नगर पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन तायडे साहेब,नगराध्यक्ष श्री आनंदा भाऊ पाटील,नगरसेवक निलेश भाऊ माळी, डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ उद्धव पाटील,,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल सेठ अग्रवाल,उपाध्यक्ष नगरसेवक राजेश शेठ नानवणी,माजी नगराध्यक्ष सईद दादा बागवान,नगरसेवक दिनेश भाऊ माळी,माजी गटनेते देवाभाऊ खेवलकर,महिला पदाधिकारी अश्विनीताई पाटील,व्यापारी अमृत शेठ पटेल,सुभाषशेठ चौधरी,दीपक चौधरी सर,संदेश चौधरी,पत्रकार श्री अर्जुन आसने,डॉ धर्मेंद्र पालवे,डॉधनंजय राजपूत,डॉ खंडेलवाल,डॉ कळसकर,डॉ श्रीकृष्ण माळी,डॉ महेंद्र पाटील,प्रशांत बडगुजर,विलास बारी तसेच समाजातील राजकीय ,सामाजिक क्षेत्रांतील अनेक लोकांनी कार्यक्रमाला भेट देऊन रक्तदान केले व सेवा फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे साहेब यांनी रक्तदान करून सेवा फाउंडेशन च्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी एकूण ५५ रक्तदात्यांचे रक्त संकलित करून जळगाव शासकीय रुग्णालय येथे देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा फाउंडेशन चे डॉ विशाल चौधरी, डॉ वैभव पाटील,डॉ दिलीप तेली,विवेक वखरे,डॉ योगेश राजपूत,डॉ प्रशांत पाटील,डॉ प्रल्हाद पाटील,योगेश घनोकार,नितीन धांडे, कृष्णा माळी,संजय गंगतिरे, निलेश देशमुख व सेवा फाउंडेशनचे सहकारी यांनी मेहनत घेतली..
येथील सामाजिक कार्य करणारी म्हणून सेवा फाउंडेशन ची ओळख आहे. बोदवड येथील रहिवाशी आशिष अजय अग्रवाल हा विद्यार्थी बोदवड तालुक्यातून कॉमर्स पदवीधर शाखेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल त्याचा व त्याच्या कुटूंबियांचा सत्कार सेवा फाउंडेशन कडून करण्यात करण्यात आला.
यावेळी आशिष अग्रवाल याला संस्थेचे सन्मानपत्र, श्रीफळ, शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आशिष पुढील शिक्षण पुणे येथे करीत असून सी. ए.ची तयारी करीत आहे. तसेच समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्या यांचे वाटप करण्यात आले.
हर्षल किरण बावस्कर, कोमल व निकिता रवींद्र माळी या
विद्यार्थ्यांना इ.९ वी ते ११वी ची पुस्तके व ह्यांचे वाटप वैशाली ताई कुलकर्णी व अश्विनीताई पाटील यांचे हस्ते करण्यात - आले. यावेळी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉक्टर विशाल चौधरी यांनी भविष्यात देखील असेच उपक्रम राबविणार असल्याचे आपल्या
मनोगतात सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी ताई पाटील व वैशाली ताई कुलकर्णी हे होते. यावेळी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विशाल व पालक उपस्थित होते.
सुभाष चौधरी, डॉ. वैभव पाटील, धनग सर, विवेक बखरे सर, डॉ. दिलीप तेली योगेश धनोकार, कृष्णा माळी हे सदस्य
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवा फाउंडेशन कडून अभिवादन करण्यात आले.तसेच बोदवड येथील न.ह.रांका हायस्कुल विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.गायत्री दिलीप चौधरी हि १०वी परीक्षेत(९२.८०%) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.त्यांनिमित्ताने कु.गायत्री तेली व तिच्या पालकांचा सेवा फाउंडेशनकडून सत्कार करण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विशाल चौधरी,डॉ वैभव पाटील,डॉ दिलीप तेली ,धनगर सर,विवेक वखरे सर,मेडिकल असोशियशनचे अध्यक्ष अतुल अग्रवाल ,दिलीप तेली व पालक उपस्थित होते
बोदवड येथे सेवा फाऊंडेशन कडून रक्तदान शिबिर संपन्नदि.08ऑगस्ट 2022ला सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष डॉक्टर विशाल सुभाष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई मंगल भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी जळगाव येथील स्वयंसेवी रक्तपेढी माधवराव गोळवलकर कडून 50रक्त दात्यांचे रक्त संकलन करण्यात आले.यावेळी बोदवड येथील गट विकास अधिकारी हेमंत काथेपुरी साहेब,नगरपंचायत चे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे साहेब,पोलीस स्टेशन चे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ साहेब ,नगराध्यक्ष आनंदा पाटील,डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ उद्धव दादा पाटील,नगरसेवक भरत आप्पा पाटील,नगरसेवक विजय बडगुजर,नगरसेवक सईद बागवान,सामाजिक कार्यकर्ते हर्षल बडगुजर,गोलू बरडीया,व्यापारी संघटनेचे राजेश नानवाणी ,डॉ सुधीर पाटील,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अग्रवाल,अंगणवाडी सेविका प्रमुख इंगले मॅडम,डॉ वैभव पाटील,अमृत पटेल हे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सभेचे अध्यक्ष डॉ उद्धव पाटील हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिलीप तेली यांनी केले.कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गुंजाळ साहेब,डॉ सुधीर पाटील,डॉ प्रशांत बडगुजर,डॉ उद्धव पाटील ,कुमारी निर्मिती दीपक चौधरी यांनी डॉ विशाल चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सेवा फाउंडेशन च्या उपक्रमाचे कौतुक केले.बोदवड शहरातील सेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला माजी गट नेता देवा खेवलकर,नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक निलेश माळी,सामाजिक कार्यकर्ते शांताराम कोळी,माजी मुख्याध्यापक एन ए पाटील सर,दीपक चौधरी सर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन फाउंडेशन च्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ विशाल सुभाष चौधरी,डॉ वैभव पाटील,डॉ योगेश राजपूत,डॉ प्रल्हाद शिंदे,डॉ प्रशांत पाटील,विवेक वखरे,योगेश घनोकार,संजय गंगतिरे,दिलीप तेली,निलेश देशमुख,नितीन धांडे, कृष्णा माळी ,कार्तिक जैस्वाल,सुनील तायडे,वासुदेव शिंपी यांनी परिश्रम घेतले.*
बोदवड येथील सेवा फाऊंडेशन कडून वृक्षारोपण व मोफत औषधी वाटप कार्यक्रमदि.१८ऑगस्ट २०२२रोजी करण्यात आला बोदवड तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर उद्धव दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड येथील रेणुका हायस्कूल मध्ये वृक्षारोपण व बोदवड शहरातील कमी वजनाच्या बालकांना औषधी वाटप करण्यात आली.डॉ उद्धव पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.मुख्याध्यापक आर.एस.धनगर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.सदर कार्यक्रमाला सेवा फाउंडेशन अध्यक्ष डॉ.विशाल सुभाष चौधरी,सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुधीर पाटील,डॉ. वैभव पाटील,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अग्रवाल हे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप तेली यांनी केले.सेवा फाउंडेशनविषयी यावेळी उपस्थित लोकांना माहिती देण्यात आली. शाळेच्या परिसरात डॉ उद्धव दादा पाटील यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. सेवा फाउंडेशन कडून बालकांना कॅल्शियम व रक्त वाढीची मोफत औषधींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अंगणवाडी सेविका रत्नाबाई ईश्वर फाटे,मनीषा यशवंत बडगे,संगीता सुरेश माळी, सरला संजय उगले,पार्वती मारोती गव्हाळे, परिचर सीमा भुपेंद्र कापडे या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.बोदवड शहरातील कमी वजनाच्या बालकांना रक्तवाढीच्या व कॅलसियमच्या औषधींचे वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात डॉ उद्धव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विशाल सुभाष चौधरी,डॉ.सुधीर पाटील, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अग्रवाल,सौ.सविता खेलवाडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपली मनोगते व्यक्त केली सेवा फाउंडेशन राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले..सेवा फाउंडेशनच्या या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका,सामाजिक कार्यकर्त्या सौ.वैशाली कुलकर्णी,डॉ.अतुल सीखवाल, डॉ. आनंद जैन,विलासभाऊ तेली,रेणुका हायस्कूलमधील शिक्षक पि.जे. हिरोळे,मराठे सर,पि.व्ही.तायडे सर,बुंदेले सर,अग्रवाल मॅडम हे उपस्थित होते. मुख्याध्यापक आर.एस.धनगर यांनी आपल्या मनोगतात डॉ उद्धव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सेवा फाउंडेशन च्या कार्यक्रमाचे कौतुक केले.उपस्थित मान्यवरांनी सेवा फाउंडेशन राबवित असलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात..सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा फाउंडेशनचेअध्यक्ष डॉ विशाल सुभाष चौधरी,डॉ वैभव पाटील,डॉ योगेश राजपूत,विवेक वखरे डॉ प्रल्हाद शिंदे,योगेश घनोकार,दिलीप तेली,निलेश देशमुख, डॉ. संजीवनी पाटील, सौ.प्रीती चौधरी, सौ.ललिता तेली,नितीन धांडे,वासुदेव शिंपी यांनी परिश्रम घेतले.*
वृक्षारोपण कार्यक्रम 13 एप्रिल 2017 रोजी बोदवड येथील बुद्ध विहार मध्ये सेवा फाऊंडेशन तर्फे वृक्षरोपण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 एप्रिल 2017 बुद्ध विहार मध्ये वृक्षारोपण संपन्न झाले वीस झाडे लावण्यात आली सोबत रिकार्ड लोखंडी जाळीचे देण्यात आले 100 लिटरची पाण्याची टाकी देण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित सेवा फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर विशाल सुभाष चौधरी डॉक्टर योगेश राजपूत ॲड.विकास शर्मा राहुल शर्मा संजय वराडे सुरवाडे साहेब बी डि ओ साहेब बोदवड तहसीलदार भाऊसाहेब थोरात डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर उद्धव पाटील भरत अप्पा पाटील अनिल खंडेलवाल अजय गायकवाड अमृत शेठ पटेल विनोद फादर दीपक झांबड विजय माळी प्रकाश चौधरी योगेश धनोकार व सूत्रसंचालन सुनील तायडे सर यांनी केले
01/13
बोदवड । पर्यावरण, संस्कार आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या सेवा फाउंडेशनने महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी बुद्धविहार, साकला कॉलनीत २० वेगवेगळ्या रोपांची लागवड केली.
याशिवाय येत्या जून महिन्यात फाउंडेशनने ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यापूर्वी संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये १६ झाडे लावली होती. तसेच फाउंडेशनतर्फे दर शनिवारी शिरसाळा मारुती मंदिरावर लहान मुलांना बोधपर वचने सांगितली जातात. वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विशाल चौधरी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य डॉ. उद्धव पाटील, विनोद पाडर, अनिल खंडेलवाल, के. एस. सुरवाडे, संदीप तायडे आदी उपस्थित होते.
स्मशानभूमी स्वच्छता अभियान बोदवड येथील स्मशानभूमी सेवा फाऊंडेशन बोदवड तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले 22 एप्रिल 2016 मध्ये सुट्टीचा दिवस रविवार या दिवशी श्रमदान म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला व दर रविवारी आठवड्यातून एक दिवस स्मशानभूमीची स्वच्छता करावी असे सर्वानुमते ठरले तसेच परिसरातील स्वच्छता झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विशाल चौधरी डॉक्टर योगेश राजपूत राहुल शर्मा कृष्णा माळी विजय थांबेत महेंद्र सुरडकर संतोष माळी प्रीतम माळी सुनील तायडे सर यांनी उपक्रमात श्रमदान केले सेवा फाउंडेशन तर्फे दाबून आणण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे
सेवा फाउंडेशन बोदवड जि. जळगांव तर्फे वृक्षारोपण व सत्कार समारंभ
र. नं. 18749/ जळगांव
पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपणाची गरज लक्षात ठेवून सेवा फाउंडेशन बोदवड तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच बोदवड परिसराच्याहितासाठी गौरवास्पद कार्य केलेल्या कर्तृत्वान सेवाभावी व्यक्तीचा सत्कार आयोजित केलेला आहे. तरी आपण या प्रेरणादायी कार्यक्रमास आपण आपला अमुल्य वेळ द्यावा. ही नम्र विनंती.
श्री. भाऊसाहेब थोरात साहेब ( तहसिलदार तथा प्रशासक, बोदवड) मा. मा. श्री. सी. डी. बनकर साहेब (पोलीस निरीक्षक पो.स्टे., बोदवड) मा. श्री. अनिलजी खंडेलवाल (माजी जि.प.सदस्य, जळगांव) श्री. दिपकजी तेली श्री. शांतारामजी कोळी श्री. भास्करजी गुरचळ (सेवा संघर्ष समिती, बोदवड) श्री. हरिओमजी जैसवाल ( कर्तृत्व संपन्न समाजसेवक)
दि. 8 ऑगस्ट 2016 वार : सोमवार स्थळ : मुक्ताई मंगल भवन, शालीमार टॉकीज जवळ, बोदवड
दुपारी १ वा. वृक्षारोपण कार्यक्रम . सत्कार समारंभ कार्यक्रम संपल्यानंतर जय हनुमान मंदीर परिसरात विद्या नगर, बोदवड
अध्यक्ष डॉ. विशाल सुभाष चौधरी -
सर्व सेवा फाउंडेशन पदाधिकारी, सदस्य आणी मित्र परिवार, बोदवड
We love our customers, so feel free to visit during normal business hours.
संपर्क
सेवा फाऊंडेशन, (ऑफिस)
पत्ता
चौधरी क्लिनिक व डिजीटल एक्सरे सेंटर, सेंट्रल बँकेजवळ, श्रीकृष्ण मेडीकलच्या वर (पहिला मजला)
स्टेशन रोड बोदवड.
फोन नं. 9309736646 ,7020352139
संस्थापक अध्यक्ष
डॉ.विशाल सुभाष चौधरी
सेवा फाऊंडेशन बोदवड) फोन नं. 9370743146
ई-मेल
Website
facebook Sevafoundation
सेवा फाउंडेशन ही बोदवड पंचकोशीतील काही समविचारी मित्रांनी आपल्या समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एक संस्था आहे. तसेच सेवा फाउंडेशन ही सेवा भावी संस्था असून शासनमान्य रजिस्ट्रेशन केलेली आहे. आपल्या परिसराची सेवा मानव व निसर्ग या दोन माध्यमातून करणारी ही संस्था आहे